[Marathi] - Covid - 19 सह आयुष्याचे रंग '

[Marathi] - Covid - 19 सह आयुष्याचे रंग '

Written by:
Vijay Waghela
Narrated by:
Vijay Waghela
A free trial credit cannot be used on this title

Unabridged Audiobook

Ratings
Book
Narrator
Release Date
October 2022
Duration
1 hour 35 minutes
Summary
आपण कौटुंबिक माणसं , कुटुंब घेऊन जगणारी माणसं , म्हणजेच कौटुंबिक समस्या घेऊन जगणारी माणसं . समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन जगणारी माणसं . नकळतपणे विसरतो की अपेक्षा मागे ठेवूनच या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे . कदाचित यालाच जीवनचक्र म्हणावं लागेल .

जीवन प्रवाहात प्रवाहीत असताना निरपेक्षपणे जीवन व्यतीत करणा-या काही पुण्यात्म्यांचा स्पर्श आपल्या नळतपणे आपल्याला होत असतो . अशावेळी आपण जर आपले विचार बुद्धी , चारित्र्य यांची शुचिता ठेवून मार्गक्रमण करीत असलो तरच आपल्याला त्या परिस स्पर्शाची जाणीव होत असते . अन्यथा आपण आयुष्याने दिलेल्या एका अनोख्या मेजवानीला मुकतो .

अशीच एक मेजवानी कोरोनानं आपल्याला दिली . आपल्या आजुबाजूच्या व्यक्तिंच्या अंतर्मनात डोकावण्याची . खरंतर कोणाच्या अंतर्मनात घुसून प्रवास करणं एवढं सोपं नसतं . पण प्रवास सुरू झाला आणि आवड निर्माण झाली तर मात्र हा प्रवास कधीच संपू नये असं वाटतं , किंबहुना आपला लांब पल्ल्याचा झालेला प्रवास सुद्धा आत्ता कुठं सुरू झालाय असं वाटतं . कदाचित हे वाटणंच मृत्यू नंतर सुद्धा जगण्याची आशा दाखवत असावं . मृत्यू म्हणजे शेवट नाही यावर शिक्कामोर्तब करत असावं .

कोरोनाच्या मृत्यू शय्येवर जाऊन परत आलेल्या प्रत्येकाला हे सत्य जाणवलेलं असावं . खरंतर या कोरोना कालावधीमध्ये खूप खूप जणांनी खूप खूप जणांच्या अंतर्मनात कळत नकळतपणे प्रवास केला असावा असं वाटतं . म्हणूनच या काव्यसंग्रहास ' Covid - 19 सह आयुष्याचे रंग ' हे नाव योग्य वाटलं .



श्री . विजय मनसुख वाघेला




THIS AUDIOBOOK MAY INCLUDE INFORMATION REGARDING THE COVID-19 PANDEMIC. INFORMATION RELATED TO COVID-19 CONTINUES TO EVOLVE. AUDIOBOOKS.COM ENCOURAGES YOU TO SEEK UP-TO-DATE INFORMATION AND GUIDANCE FROM YOUR LOCAL PUBLIC HEALTH UNIT.
Browse By Category
1 book added to cart
Subtotal
$5.00
View Cart